म्युच्युअल फंडामध्ये महाराष्ट्र गुंतवणुकीत पुढे
मुंबई :
अलीकडच्या काळात डिमॅट खाते उघडण्याचे प्रमाण भारतात वाढले असून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने पाहता महाराष्ट्र राज्य हे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते आहे.
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी छोट्या शहरांपासून ते मोठ्या शहरांमधील लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत, असे दिसून आले आहे. यामुळे म्युच्युअल फंड व्यवस्थापन मालमत्तांमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. सप्टेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करण्यामध्ये महाराष्ट्र हे राज्य आघाडीवर राहिले आहे. एकूण म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापन मालमत्तांमध्ये 56 टक्के इतका वाटा भारतातील केवळ तीन राज्यांनी प्राप्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.
अन्य राज्ये...
सप्टेंबर 2024 पर्यंत देशातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण 67.09 लाख कोटी रुपयांच्या एयुएममध्ये महाराष्ट्राचे योगदान 27.49 लाख कोटी रुपये होते. यानंतर दुसऱ्या स्थानावर 5.49 लाख कोटी रुपयेसह दिल्ली आणि 4.82 लाख कोटी रुपयांसह गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेश सहाव्या स्थानावर आहे.