For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रगत शिक्षण ही काळाची गरज

11:59 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रगत शिक्षण ही काळाची गरज
Advertisement

’इग्नु’ च्या पदवीदान सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन : फर्मागुडीत स्थापन होणार इग्नुच स्वतंत्र कॅम्पस

Advertisement

पणजी : आजच्या तऊणांना उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वत:ला सुसज्ज करावे लागत असल्याने प्रगत शिक्षण ही काळाची गरज आहे. अशावेळी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) सारख्या संस्थांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित अभ्यासक्रम या देशातील तऊणांपर्यंत पोहोचल्यास ‘विकसित भारत 2047’ चे उद्दीष्ठ साध्य करणे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (गोवा शाखा) मंगळवारी दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या पदवीदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी 1363 विद्यार्थ्यांना यंदा इग्नुची पदवी आणि पदविका प्राप्त झाली आहे. त्यापैकी निवडक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्र्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. इग्नुच्या गोवा शाखेचे संचालक कामेश्वरी मूर्ती आणि अन्य मान्यवरांची त्यावेळी उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी भारत सरकारने सुरू केलेल्या स्किल इंडिया कार्यक्रमाशी संबंधित प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम ऑफर केल्याबद्दल इग्नुचे कौतुक केले. इग्नुमध्ये पदवी, पदव्युत्तर तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी देशातील 32 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गोव्यातूनही असंख्य विद्यार्थी या विद्यापीठातून शिक्षण घेतात. या विद्यापीठामुळे ‘हर घर ग्रॅज्युएशन’ हे उद्दीष्ट साध्य करणे शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

इग्नु कॅम्पससाठी 5 हजार चौ. मी. जमीन

Advertisement

गोव्यातून इग्नुत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे आता त्यांना वाढीव कॅम्पसची गरज भासू लागली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने फर्मागुडी येथे इग्नुच्या कायमस्वऊपी कॅम्पससाठी 5 हजार चौ. मी. जमीन दिली आहे. शक्य तेवढ्या लवकर गोव्यात इग्नुचा कॅम्पस होणे आवश्यक आहे. पारंपरिक शिक्षणासह कौशल्य विकास आणि प्रगत शिक्षण घेण्याची गरज आहे. कौशल्य विकास शिक्षणासाठी केंद्र सरकारने कौशल्य मंत्रालय स्थापन केले आहे. कौशल्य शिक्षण ही काळाची गरज आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकाला समान संधी हवी : मूर्ती

यावेळी बोलताना डॉ. मूर्ती यांनी, ‘आपल्यापैकी प्रत्येकाला उच्च शिक्षण घेण्यासाठी समान संधी मिळायला हवी. तरीही विविध कारणांमुळे अनेकांना ते मिळत नाही. अशा सर्वांसाठी इग्नूकडे उत्तर आहे, असे सांगितले.

Advertisement
Tags :

.