ॲड. संग्राम देसाईंचा मालवण वकील संघटनेने केला सत्कार
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा अध्यक्षपदी निवड झाल्याचे औचित्य
मालवण | प्रतिनिधी
"माझ्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील तुम्ही सर्व वकील माझ्या पाठीशी ठाम राहिलात, तुम्हा सर्वांमुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान मला मिळाला. तुमच्या सर्वांची मान अभिमानाने ताठ राहील असे आदर्शवत काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. मुंबईत अत्याधुनिक सुविधा असलेले भवन उभारणी, मालवणसह अनेक न्यायालयांचा नवीन इमारती बांधकाम तसेच वकील संघटनांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर राहीन, आज सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक वकील अध्यक्ष बनला आहे", अशा भावना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांनी व्यक्त केल्या आहेत.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांचा सत्कार समारंभ मालवण दिवाणी न्यायालयाचे सन्मा. न्यायाधीश श्री. देवकते यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुका अध्यक्ष सतीशकुमार धामापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मालवण तालुका वकील संघटनेच्या वतीने सर्वप्रथम मालवण तालुका न्यायालय येथे आयोजित केला.
ॲड. संग्राम देसाई यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा सदस्य पदाची निवडणूक लढविण्याचे ठरविल्यानंतर मालवण तालुका वकील संघटनेने सर्वात प्रथम एकमुखाने पाठिंब्याचा ठराव केला होता, त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच तालुका वकील संघटनांनी एकमताने ठराव केले होते. याचे स्मरण करून देवून ॲड. संग्राम देसाई यांनी मालवण वकील संघटनेचे मनापासून आभार व्यक्त केले.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे सदस्यपदी ॲड. संग्राम देसाई निवडून आल्याने कोकणातील वकीलांना बार कौन्सिल मध्ये पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाले. या कार्यकाळात त्यांची दोन वेळेस बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे उपाध्यक्षपदी निवड झाली होती. या पदास न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत त्यांनी वकीलांकरीता कल्याणकारी उपक्रम अन्य सदस्यांच्या सहकार्याने राबविलेले होते. दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी ॲड. संग्राम देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीतील वकील मुंबई येथे मोठ्या संख्येने बार कौन्सिल कार्यालयात हजर होते. त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांचा पहिला सत्कार मालवण तालुका वकील संघटना मालवण न्यायालय येथे संपन्न झाला.
यावेळी मालवण दिवाणी न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश श्री. देवकते, तालुका वकील संघटना अध्यक्ष सतीशकुमार धामापूरकर, ॲड. समीर गवाणकर, ॲड. रुपेश परुळेकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. ॲड. गवाणकर, ॲड. धामापूरकर यांनी देसाई सरांच्या कार्याचा लेखाजोगा मांडला. अध्यक्ष निवडीचा हा क्षण आदर्शवत व अभिमानास्पद असल्याच्या भावना सर्वांनीच व्यक्त केल्या.
यावेळी उपाध्यक्ष मिलिंद सुकळी, सचिव ॲड. अक्षय सामंत, मालवण अधिवक्ता परिषद अध्यक्ष ॲड. प्रदीप मिठबावकर, जेष्ठविधिज्ञ ॲड. समीर गवाणकर, ॲड.गिरीश गिरकर, ॲड. दिलीप ठाकूर, ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अंबरीश गावडे, ॲड.शिल्पा टिळक, ॲड.सोनल पालव, ॲड. रश्मी मोंडकर, ॲड. स्वरूप पई, ॲड. अविनाश पाटकर, ॲड. ह्रषी देसाई, ॲड. हरेश्वर गरगटे, ॲड. पलाश चव्हाण, ॲड.महेश बावकर, ॲड.स्वप्नील पराडकर, ॲड. सुमित जाधव, ॲड. अक्षय पवार आणि अन्य वकील वर्ग उपस्थित होते