ॲड. समीर वंजारी यांची कोकण विभागीय पतसंस्था फेडरेशनवर कायदेशीर तज्ज्ञ संचालक म्हणून निवड
04:12 PM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सावंतवाडी : सहकार क्षेत्रातील युवा विधिज्ञ आणि वैश्य समाज पतसंस्था, सिंधुदुर्गचे संचालक ॲड. समीर वंजारी यांची कोकण विभागीय पतसंस्था फेडरेशनवर कायदेशीर तज्ज्ञ संचालक म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. फेडरेशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुले यांनी निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनमधील उत्कृष्ट कार्य, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि कायदेशीर विषयांवरील प्रभुत्व लक्षात घेऊन ॲड. वंजारी यांची ही निवड करण्यात आली आहे. ते सध्या वैश्य समाज पतसंस्था, सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत.
Advertisement
या निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, वैश्य समाज पतसंस्थेचे अध्यक्ष बाळा वळंजू, माजी अध्यक्ष सुनील कोरगावकर, दिलीप पारकर आणि बाळा पारकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच इतर सर्व संचालकांचेही सहकार्य मिळाले.
ॲड. समीर वंजारी यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
Advertisement
Advertisement
