For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ॲड. महेश राऊळ यांचा उद्या कृतज्ञता गौरव सोहळा

03:13 PM Oct 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
ॲड  महेश राऊळ यांचा उद्या कृतज्ञता गौरव सोहळा
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी आणि अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विषयक जनहित विनामूल्य लढविणारे कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी तथा ॲड. महेश राऊळ यांचा रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता कृतज्ञता गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते , नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलैश पै, अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे सचिव अण्णा म्हापसेकर यांनी केले आहे. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर स्कुलचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना न्याय देण्याचा ॲड. महेश राऊळ यांचा प्रयत्न आहे. याबद्दल कृतज्ञता म्हणून हा गौरव सोहळा आयोजित केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.