For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्व. ॲड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन

12:34 PM Jan 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
स्व  ॲड  अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन
Advertisement

परूळे प्रतिनिधी

Advertisement

सलग ३५ वर्षे एकांकिका स्पर्धेचे आयोजन करणे ही साधी गोष्ट नाही . पण परुळे युवक कला क्रीडा मंडळांने मोठे शिव धनुष्य पेलले आहे त्याकरिता सर्वप्रथम मंडळाच्या सर्व सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन. श्री देव आदिनारायणाच्या समोर ही स्पर्धा होत असून त्यामुळे कलाकारांना कला सादर करण्याची स्फूर्ती मिळत आहे ही स्पर्धा अशीच चालू राहो आणि शंभर वर्षाचा टप्पा पूर्ण करो. या स्पर्धेत दोन वेळा स्पर्धक म्हणून येऊन कला सादर करता आली आणि आज उद्घाटक ,परीक्षक म्हणून येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्याला पहिले पारितोषिक मिळावे यासाठी प्रयत्न करावा.असे प्रतिपादन नाट्य अभिनेते सुहास भोळे यांनी केले. ते परूळे येथील युवक क्रीडा मंडळ आयोजित स्व. ॲड. अभयकुमार देसाई स्मृती ३५ व्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटना निमित्त बोलत होते. यावेळी नाट्य अभिनेते विनय घोनसाळकर, डॉ. उमाकांत सामंत ,लोकमान्यचे माजी संचालक आनंद सामंत, पत्रकार भूषण देसाई, मंडळाचे अध्यक्ष अमेय देसाई, भोगवे माजी सरपंच संजय सामंत ,राधाकृष्ण फाउंडेशनच्या अरुणा सामंत, रमाकांत सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश नाईक यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.