कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कळसुलीत ओढ्यात वाहून प्रौढाचा मृत्यू

10:51 AM Jun 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
कळसुली लिंगेश्र्वरनगर (गवसेवाडी) येथील महेश दिनकर देसाई ( 52) यांचा ओढ्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली. प्रशासन, नागरिकांनी केलेल्या शोधा शोधीनंतर रात्री उशिरा त्यांच्या मृतदेह ओढ्यात सापडला. गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते पत्नीसह जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले. त्यांच्यासोबत असलेल्या पत्नीने तातडीने वाडीतील लोकांना कळविले. तसेच महसूल व पोलिस प्रशासनालाही कळविण्यात आले. शोधा शोधीनंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनाकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली व निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, तसेच कळसूली ग्राम महसूल अधिकारी,पोलिस पाटील लिंगेश्वरनगर व ग्रामस्थ उपस्थित होते. अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # news update # kankavli # sindhudurg news # breaking news #
Next Article