For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश

10:35 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश
Advertisement

विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी शिबिरांचे आयोजन

Advertisement

बेळगाव : सीमाभागातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मोफत तसेच सवलतीच्या दरात प्रवेश मिळावा यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 9 रोजी निपाणी, सोमवार दि. 13 रोजी भालकी, मंगळवार दि. 14 रोजी खानापूर व बेळगाव येथे अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी व पालकांना दिली जाणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवाजी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 मराठी भाषिक गावांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत व सवलतीच्या दरात विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जातो. शिवाजी विद्यापीठ परिसरातील सर्व अभ्यासक्रमांसाठी ही सवलत योजना लागू करण्यात आली आहे. यामधील अनुदानित अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ तर विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी 25 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वसतिगृहासाठीची फी पूर्णत: माफ केली जाणार आहे. म. ए. समितीने महाराष्ट्र सरकारकडे प्रवेशाबाबत अर्ज दाखल केल्यानंतर मागील दोन वर्षांपासून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने प्रवेश योजना सुरू केली आहे. मागील दोन वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले आहेत. जे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित राहावे. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध आहे. गुरुवार दि. 9 मे रोजी सकाळी 11.30 वाजता निपाणी येथील देवचंद महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिर होणार आहे. सोमवार दि. 13 रोजी सकाळी 11.30 वाजता भालकी येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज येथे शिबिर होणार आहे. मंगळवार दि. 14 रोजी सकाळी 10.30 वाजता खानापूर येथील शिवस्मारक तर दुपारी 3 वाजता बेळगाव येथील संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, रेल्वे ओव्हरब्रिजजवळ, खानापूर रोड येथे शिबिर घेतले जाणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.