For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

प्रशासकीय पदभरती परीक्षा गैरव्यवहार प्रकरण; मुख्य सूत्रधाराला हरियाणातून अटक

10:57 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रशासकीय पदभरती परीक्षा गैरव्यवहार प्रकरण  मुख्य सूत्रधाराला हरियाणातून अटक
Advertisement

फोंडा : प्रशाकीय साहाय्यक पदभरतीसाठी फर्मागुडी येथील आयआयटीमध्ये झालेल्या लेखी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी मुख्य सूत्रधार मियास सिंग (रा. हरियाणा) याला हरियाणा येथून फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फोंडा पोलिस स्थानकात आणून त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पाच दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement

गेल्या १० ऑक्टोबर रोजी प्रशाकीय साहाय्यक पदभरतीसाठी लेखी परीक्षा होती. या प्रकरणातील अन्य दोघे संशयित राकेश दहोलीया (२९, रा. नवी दिल्ली) व अंकित सिंग (२३, रा. हरियाणा) यांना त्याचदिवशी अटक केली होती. लेखी परीक्षेच्यावेळी दोघा संशयितांनी ब्ल्यू टूथ इअरपिस व अन्य काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला होता. तसेच एका संशयिताने दुसऱ्या उमेदवाराच्या नावाने लेखी परीक्षा दिल्याचे तपासात उघड झाले होते.

बुधवारी अटक केलेला मुख्य सूत्रधार मियास सिंग हा हरियाणामधून फोनवरून परीक्षा देणाऱ्या या संशयितांना उत्तरे सांगत होता. उत्तरपत्रिका देऊन संशयित राकेश व अंकित हे परत आपल्या घरी जाण्याच्या मार्गावर असताना दाबोळी विमानतळावर सुरक्षा तपासणी दरम्यान ते पकडले गेल्याने त्यांचे बिंग फुटले. या प्रकरणी झालेली ही तिसरी अटक असून राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेत अशा प्रकारे गैरप्रकार करण्यामागे एखाद्या रॅकेटचा सहभाग आहे का? याचा शोध घेतला जात आहे. हा एकंदरित गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.