Satara News | साताऱ्यात प्रशासकीय इमारती बनल्या 'ओपन बार'! दिवसाढवळ्या रंगतायत दारूच्या पार्ट्या
साताऱ्यात दिवसाढवळ्या ‘ओपन बार नागरिकांमध्ये संताप
सातारा : सातारा शहरातील नगरपरिषद आणि जिल्हापरिषद यांच्या मालकीच्या इमारती आणि मोकळ्या जागेत दिवसाढवळ्या आणि रात्रीही ओपन बार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या दारुड्यांवर कोण अंकुश ठेवणार असा सवाल शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे.
राजवाडा परिसरातीलजुना जनावरांचा दवाखाना परिसर हा जिल्हा परिषद मालकीचा असून या ठिकाणाला रात्री मोठ्या प्रमाणात ओपन बारचे स्वरुप येत आहे. हा संपूर्ण परिसर छायादार वृक्षाच्या सावलीत असल्याने या ठिकाणी थंड हवा आणि गारवा मिळत असल्याने दिवसाही येथे परिसरातील बेवड्यांच्या पार्ध्या रंगलेल्या दिसत आहेत, तर नगरपरिषद मालकीच्या काही शॉपिंग सेंटर, भाजी मंडई, इमारतीच्या पार्किंग मध्ये दिवसा आणि सायंकाळी ही लोक दारू पिताना सहजच दिसत आहेत.
मद्यपींचा त्रास नको म्हणून या ठिकाणी वाहने पार्किंग करणे लोक टाळत आहेत. पार्किंग केल्यास बाहनांचे आरसे, हॉ र्न, चोरी होत आहेत. जवळच म्हणजे तांदूळ अळीमधील दुकानातून एक कॉटर, एक बिस्लरी, पुड्या घेतल्या की बारचा खर्च वाचवत या ओपन बार मध्ये खुलेआम दारू सेवन होत आहेत, बेवड्या आणि गुंडस्वरूपाच्या या लोकांच्या नादी कोण लागणार म्हणून नागरिक कानाडोळा करत असल्याने त्यांची मजल आणखी बाढलो असून दिवसाढवळ्या ही ओपन बार दिसत आहेत.