For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Amrit Bharat Station Scheme | कोट्यवधींचा खर्च अन् पहिल्याच झटक्यात फॉल्स सिलिंग खाली; सोलापूर रेल्वे स्थानकातील 'त्या' ढिसाळ कामावर प्रश्नचिन्ह!

02:52 PM Jun 07, 2026 IST | NEETA POTDAR
amrit bharat station scheme   कोट्यवधींचा खर्च अन् पहिल्याच झटक्यात फॉल्स सिलिंग खाली  सोलापूर रेल्वे स्थानकातील  त्या  ढिसाळ कामावर प्रश्नचिन्ह
Advertisement

Advertisement

सोलापूर -अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नव्याने करण्यात आलेल्या कामांमधील शुक्रवारी फॉल्स सिलिंगचा भाग कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शनिवारी सोलापूर विभागीय कार्यालयात बरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर स्थानकावरील संपूर्ण फॉल्स सिलिंग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, संबंधित ठिकाणी पीयूएफ बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

स्थानक परिसरात शनिवारी सकाळपासून १० ते १५ कर्मचारी फॉ ल्स सिलिंग हटविण्याच्या कामातगुंतले होते. सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य प्रवेशद्वारही काही काळासाठी प्रवाशांसाठी बंद ठेवले होते.या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करत रेल्वे प्रशासनाने कठोर पाऊल उचलल्याची चर्चा आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सोलापूर स्थानकातील कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

अमृत भारत योजनेअंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर त्याची योग्य पाहणी न करता काम स्वीकारण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात रंगली आहे.शुक्रवारी चौकशी कक्षासमोरील फॉल्स सिलिंगचा भाग अचानक कोसळल्याने नव्याने करण्यात आलेल्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोट्यवधी रुपये खर्चुन विकसित करण्यात आलेल्या स्थानकावर अशी घटना घडल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. परिसरातील फॉल्स सिलिंग हटवून नवीन व्यवस्था उभारली जाणार असल्याचे संकेत मिळत असून, या घटनेमुळे अमृत भारत योजनेतील कामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Advertisement
Tags :

.