महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

14 ऑक्टोबरपासून कुडाळ- सावंतवाडी वाहतूक बुर्डीपूल मार्गे वळविणार

03:37 PM Oct 13, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रशासनाच्या सूचना ; सर्व्हिस स्टेशन उभारण्याकरिता निर्णय

Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

सावंतवाडी बसस्थानक येथे इलेक्ट्रिक बससाठी सर्व्हिस स्टेशन उभारण्याचे काम 14 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येत आहे. या कामासाठी कोलगाव विद्युत सबस्टेशन येथून वीज पुरवठा करण्यासाठी कोलगाव ते बसस्थानक मार्गावर रस्त्याच्या एका बाजूने गटार खोदाई केली जाणार आहे. दरम्यान, या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एसटी बस, ट्रक , खासगी बसेस व अवजड वाहने बुर्डीपूल मार्गे वळविण्यात यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. याची चालकांनी नोंद घ्यावी. सावंतवाडी आगारातून जाणाऱ्या व येणाऱ्या कुडाळ, माणगाव, आंबेगाव, व मठमार्गे वेंगुर्ला एसटी बसेस 14 ऑक्टोबरपासून बुर्डीपूल मार्गे वळविण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन आगार प्रमुख निलेश गावित यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # konkan update # news update
Next Article