For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईदसाठी प्रशासन सज्ज; शांतता-सलोखा राखा

06:36 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
ईदसाठी प्रशासन सज्ज  शांतता सलोखा राखा
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे आवाहन : ईदच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

ईद-ए-मिलाद हा शांतता, बंधुभाव व सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा सण आहे. त्यामुळे सण उत्साहात साजरा करताना शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व समाजघटकांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे. गेल्यावषीप्रमाणे यंदाही सर्वांच्या सहकार्याने सण शांततेत पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

Advertisement

ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी आयोजित पूर्वतयारी बैठकीत ते म्हणाले, मिरवणुकीदरम्यान डीजेचा वापर पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. ईदची मिरवणूक सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावी. मिरवणूक ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गाची संबंधित विभागांनी आधीच पाहणी करून आवश्यक दुऊस्तीची कामे पूर्ण करावीत. रस्त्यांवरील ख•s बुजविणे, स्वच्छता करणे तसेच मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळे दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मिरवणूक मार्गावरील खड्डे अनधिकृत केबल्स हटवा

आमदार आसिफ सेठ म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून शहरात ईद-ए-मिलादचा सण शांततेत व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाही जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने आवश्यक ते सहकार्य करावे. मिरवणूक मार्गावरील खड्डे  तातडीने बुजवावेत. तसेच रस्त्यांवरील अनधिकृत केबल्स हटवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सणाच्या काळात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारची प्रक्षोभक सजावट, पोस्टर्स किंवा बॅनर्स लावू नयेत. सोशल मीडियावर पोलिसांची विशेष नजर राहणार असून, जातीय सलोखा बिघडविणाऱ्या अफवा, आक्षेपार्ह मजकूर किंवा प्रक्षोभक पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविऊद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची खातरजमा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन

बैठकीला उपस्थित समाजनेत्यांनी ईद-ए-मिलादचा सण शांतता व सलोख्याने साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एम. एम. बसरगी, प्रांताधिकारी श्र्रवण नायक, महापालिका आयुक्त कार्तिका एम. यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.