For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गावठी दारु-अमलीपदार्थांविरुद्ध प्रशासनाने थोपटले दंड

12:17 PM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
गावठी दारु अमलीपदार्थांविरुद्ध प्रशासनाने थोपटले दंड
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यातून गावठी दारू व अमलीपदार्थांची विक्री काटेकोरपणे थोपविण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. बुधवारी विविध खात्यांच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना दिली आहे. या बैठकीत पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी, अबकारी विभागाचे जगदीश कुलकर्णी, स्वप्ना, एन. सी. पाटील, विजय हिरेमठ, रवी मुरगोड, शंकरगौडा आदींसह पोलीस, अबकारी, परिवहन, शिक्षण व वनविभागातील अधिकारी उपस्थित होते.

बेळगाव दक्षिण व उत्तर अबकारी जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा घेण्यात आला. खास करून गावठी दारू व अमलीपदार्थांची विक्री थोपविण्यासाठी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्थायी समिती स्थापन केली आहे. केवळ पोलीस व अबकारीच नव्हे तर शिक्षण, वन खात्यासह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनाही याकामी जुंपण्यात आले आहे. गावठी दारू थोपविण्यासाठी पोलीस, अबकारी व वनखात्याने संयुक्त मोहीम राबवून कारवाई करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. अबकारी विभागातून गेल्या वर्षभरात झालेले व्यवहार व सरकारच्या खजिन्यात जमा झालेला कर याचाही आढावा घेण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.