For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वक्फ विधेयकावरील बैठक लांबणीवर

06:14 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
वक्फ विधेयकावरील बैठक लांबणीवर
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

सुधारित वक्फ विधेयकावरील चर्चेसाठीची संयुक्त संसदीय समितीची बैठक लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही बैठक बुधवारी होणार होती. तथापि, काही तांत्रिक कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सुधारित वक्फ विधेयक हे वक्फ मालमत्तांच्या योग्य व्यवस्थापनासाठी आणि सुरक्षिततेसाठी असून ते लवकरच संसदेत मान्यतेसाठी मांडण्यात येईल. वक्फ मालमत्तांच्या कुव्यवस्थापनाला आळा घालण्यासाठी ते आवश्यक आहे, असे प्रतिपादन मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांसमोर केले होते.

ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने हे सुधारित विधेयक लोकसभेत सादर केले होते. मात्र, विरोधकांनी विरोध केल्याने तसेच मित्रपक्षांनीही ते संयुक्त संसदीय समितीकडे द्यावे अशी सूचना केल्याने तसा निर्णय घेण्यात आला. या विधेयकावर विचारविमर्श करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे खासदार जगदंबिका पाल हे आहेत.

Advertisement

सर्व पक्षांचे सदस्य

संयुक्त संसदीय समितीत निशिकांत दुबे, ब्रिज लाल, तेजस्वी यादव आणि संजय जयस्वाल हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. तर गौरव गोगोई, मोहम्मद जावेद आणि सय्यद नासर हुसेन हे काँग्रेसचे खासदार आहेत. कल्याण बॅनर्जी (तृणमूल), असदुद्दिन ओवैसी (एमआयएम) आणि संजय सिंग (आम आदमी पक्ष) यांच्यासह इतर अनेक सदस्य या समितीत घेण्यात आले आहेत. संयुक्त संसदीय समितीची पुढील बैठक जम्मू-काश्मीर आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकांच्या नंतर घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.