For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समीर कुलकर्णी विरोधातील सुनावणीला स्थगिती

06:12 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
समीर कुलकर्णी विरोधातील सुनावणीला स्थगिती
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

2008 साली महाराष्ट्रातील मालेगाव येथे झालेल्या स्फोटाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हस्तक्षेप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरोपी समीर कुलकर्णी विरोधातील सुनावणीला  स्थगिती दिली आहे. ही स्थगिती अंतरिम असून पुढील आदेशापर्यंत जारी राहणार आहे.

युएपीए अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खटल्यात कायद्यानुसार केंद्र सरकारकडून अभियोजनासाठी मंजुरी घेण्यात आलेली नाही. यामुळे माझ्याविरोधात खटला चालविला जाणे बेकायदेशीर असल्याचा दावा समीर कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केला होता.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीदरम्यान याप्रकरणातील तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारला भूमिका मांडण्यास सांगितले आहे. तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 23 जुलै रोजी होणार आहे.

महाराष्ट्रातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी स्फोट झाले होते. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक जण या स्फोटात जखमी झाले होते. याप्रकरणी समीर कुलकर्णी यांच्यासह साध्वी प्रज्ञा सिंह देखील आरोपी आहेत.

Advertisement
Tags :

.