म्युझिकल लव्हस्टोरीत दिसणार आदित्य
चित्रपट निर्माता भूषण कुमार आणि आदित्य रॉय कपूर पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. यापूर्वी दोघेही ‘आशिकी 2’ आणि ‘मलंग’ यासारख्या हिट चित्रपटांसाठी एकत्र आले होते. आता दोघेही एक म्युझिकल लव्ह स्टोरी घेऊन येणार आहेत. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप जावेरी करणार आहे. आदित्यमध्ये प्रेम अन् दु:ख पडद्यावर दाखविण्याचे एक अनोखे कसब आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका अत्यंत दमदार असेल, ज्याला प्रेक्षक अत्यंत पसंत करतील असा दावा मिलाप जावेरीने केला आहे. या आगामी म्युझिकल ड्रामा लव्ह स्टोरीत प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन, प्रभावी संवाद अन् रोमांस पाहता येणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेली नाही. परंतु याचे चित्रिकरण लवकरच सुरु केले जाणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित केला जाणार असल्याचे मिलापने म्हटले आहे.
आदित्यने एक लोकप्रिय वाहिनीवर व्हिडिओ जॉकी म्हणून कारकीर्द सुरू केली होती. त्याने 2009 साली बॉलिवुडमध्ये पाऊल ठेवले होते. तर 2013 साली ‘आशिकी 2’ चित्रपटामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.