महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आदित्य ठाकरेंची थोड्याच वेळात सावंतवाडीत सभा

05:26 PM May 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ठाकरे शैलीत मंत्री केसरकरांवर काय बोलणार ? सावंतवाडीकरांना उत्सुकता 

Advertisement

सावंतवाडी ।प्रतिनिधी

Advertisement

महाविकास इंडिया आघाडीचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी गांधी चौक येथे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा अवघ्या थोड्या वेळातच सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचारार्थ ही पहिलीच सभा आहे. आतापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांच्या प्रचार सभा या मतदारसंघात झाल्या नाहीत. मात्र डोअर टू डोअर प्रचारावर भर देण्यात आला आहे. मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीने आज शनिवारी श्री ठाकरे यांची प्रचार सभा घेऊन प्रचाराचा समारोप या जाहीर प्रचार सभेने करणार आहेत. या प्रचार सभेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर आदित्य ठाकरे ठाकरे शैलीत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Advertisement
Tags :
tarun bharat news
Next Article