For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Aditya Thakrey On Sanjay Deena Patil | "ते शिवसेनेत नव्हे, तर 'मिंधेंच्या टोळीत' गेलेत..."; आदित्य ठाकरेंनी संजय दिना पाटलांना झापले!

04:39 PM Jun 25, 2026 IST | NEETA POTDAR
aditya thakrey on sanjay deena patil    ते शिवसेनेत नव्हे  तर  मिंधेंच्या टोळीत  गेलेत      आदित्य ठाकरेंनी संजय दिना पाटलांना झापले
Advertisement

मुंबई : नुकतेच ठाकरे गटाशी बंडखोरी करुन शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमकी दिल्यामुळे ते चांगले गोच्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे... त्यांच्या वादग्रस्त वक्यव्यामुळे राज्यातुन अनेक संतापाची प्रतिक्रीया उमटत आहेत..

Advertisement

काही दिवसांपूर्वी विरोधकांना प्रत्युत्तर देताना संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांच्या त्या विधानावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पोलीस आयुक्तांकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली होती.यावर पत्रकांरांनी त्याना प्रश्न विचारले असता, संजय दिना पाटील हे संतापल्याचे दिसून आले. प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी पत्रकारांना आरे वारे केली. यावर राज्यातुन अनेक तीव्र प्रतिक्रीय व्यक्त होत आहे.. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक प्रतिक्रीया देत संजय दिना पाटील यांना धारेवर धरले आहे...

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

Advertisement

आदित्य ठाकरे म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांनी दिलेल्या धमकीवर मत व्यक्त केले. यावर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. बंडखोरी केलेले खासदार हे शिवसेनेत गेलेले नाहीत. ते मिंधे यांच्या टोळीत गेले आहेत. मिंधेंच्या टोळीची आता संस्कृती काय आहे, हे जगासमोर आले आहे. एका पळपुट्या खासदाराने सगळ्यांनाच धमकी देणे सुरू केले आहे. पत्रकारांनाही त्याने धमकी दिली आहे, असं मी नुकतंच ऐकलं आहे. आमचे खासदार संजय राऊत यांनी अगोदरच त्यांना सांगितलेले आहे की लाईनवर राहा नाहीतर लाईनवर आणावे लागेल, असा थेट इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

संजय दिना पाटील हे पत्रकारांना शिवीगाळ करतात. कार्यकर्त्यांना धमक्या देतात, लोकांना धमक्या देतात. त्यांच्यात एवढीच हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे यावे. खासदारांना सुरक्षा दिलेली आहे. ही सुरक्षा कशासाठी दिलेली आहे. लोक यांच्यापासून सुरक्षित राहिले पाहिजेत की यांना लोकांपासून धोका आहे, ते पाहिलं पाहिजे. संजय दिना पाटील हे नालायकपणे वागत आहेत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादात आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.