मथुरा येथे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कृष्ण मंदिराचे उद्घाटन
आदित्यसोबत त्याची आई रश्मी ठाकरे आणि राज्यसभा सदस्य प्रियांका चतुर्वेदी होत्या, ज्यांनी नागार्जुन फाऊंडेशनच्या एनआर अल्लुरी यांच्या मदतीने नूतनीकरणाच्या कामासाठी निधी मिळवला. शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मथुरा येथे नूतनीकरण झालेल्या ठाकूर श्यामजी महाराज मंदिराचे उद्घाटन केले. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या आई रश्मी ठाकरे आणि राज्यसभा सदस्य प्रियांका चतुर्वेदी हजर होत्या. शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या निधीसाठी पाठपुरावा करून मंदिराच्या पुनर्विकासाठी प्रयत्न केले होते.
या उद्घाटनसमयी एका कार्यक्रमाता बोलताना माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “हे पुनरुज्जीवन केलेले मंदिर प्रियंका चतुर्वेदी आणि अल्लुरीजी यांच्या अथक परिश्रमांचा पुरावा आहे. या पवित्र स्थळाचे पुनरुज्जीवन करण्यात यांचा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पाच दशकांहून अधिक काळ दुर्लक्षित राहीलेले हे मंदिर वल्लभ संप्रदायाच्या खोल रुजलेल्या इतिहासाला समृद्ध करते. अनेक दशकांचा सांस्कृतिक वारसा आणि परंपरा जतन करण्याचा एक भाग झाल्याचा मला अभिमान वाटतो.” असं आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन समारंभानंतर म्हणाले.
या दौऱ्यात त्यांनी प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरालाही भेट दिली आणि यमुना नदीच्या काठी विश्राम घाटावर प्रार्थना केली. मथुरा दौऱ्यावर भाजपने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “जे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवतात ते भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी मथुरा भेट देणाऱ्या व्यक्तीला विरोध करतात हे हास्यास्पद आहे.” असा टोला त्यांनी भाजपला लगावला.