महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आदित्य ठाकरेंनी फुंकले पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे रणशिंग !

04:20 PM Nov 23, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कामाला लागा ; आपल्याला भगवा पुन्हा फडकवायचाय ; पदाधिकाऱ्यांना आदित्य ठाकरेंच्या सूचना

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा प्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी रणशिंग फुंकले असून आगामी काळात होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत शिवसेनेचा अर्थात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी खळा बैठकीत केले. गत निवडणुकीत आपला उमेदवार थोडक्या मताने पडला त्यावेळी आपण तयारी केली नव्हती. निवडणूक जिंकणे कोकण पदवीधर मतदारसंघात आपल्यासाठी कठीण नाही. कार्यकर्त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदान नोंदणी करावी. आपला उमेदवार निश्चित निवडून येईल. त्यामुळे भविष्यात आपली ताकद दिसून येईल असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. आपण सिनेटच्या निवडणुकीसाठी तयारी केली होती. परंतु घाबरलेल्या खोके सरकारने ही निवडणूक रद्द केली . आता विधान परिषद निवडणुकीत कोकण पदवीधर मतदारसंघात आपण आपली ताकद दाखवूया असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांच्या निवासस्थानी कोलगाव येथे खळा बैठक झाली. यावेळी खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक ,पदवीधर मतदार संघाचे नोंदणी प्रमुख जैन ,जिल्हाप्रमुख संदेश पारकर ,संजय पडते, संपर्क संपर्कप्रमुख शैलेश परब, अतुल रावराणे, युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, मायकल डिसोजा ,चंद्रकांत कासार, मेघशाम काजरेकर, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . कोकण पदवीधर मतदारसंघात सध्या निरंजन डावखरे हे प्रतिनिधित्व करीत आहेत . भाजपने मतदारसंघात जोरदार मतदान नोंदणी केली आहे . या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात रणशिंग फुंकून भाजपला आव्हान दिले आहे.

Advertisement
Tags :
# sawantwadi # Aditya Thackeray# graduate constituency election!#
Next Article