आदित्य चॅम्पियन तर महिला गटात मेघाला रौप्य
06:29 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Advertisement
माँटेनेग्रोमधील बुडवा येथे सुरू असलेल्या जागतिक यु-19 बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आशियाई स्पर्धेत रौप्य पदक विजेता असलेल्या आदित्यने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले.
भारतीय बॉक्सर आदित्यने पहिल्या फेरीत मागे पडल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत रशियाच्या इस्लाम मागोमेदोव्हचा 4-1 असा पराभव केला. दरम्यान, महिलांच्या 80 किलो वजनी गटात अंतिम फेरीत मेघा शेओकंदला रशियाच्या एकतेरिना फ्रोलोव्हाकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागल्याने भारताचे दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. भारतासाठी हर्षिका (महिला 65 किलो) आणि प्राची तोकस (महिला 80+ किलो) यांनी कांस्य पदके जिंकली.
Advertisement
Advertisement
