आदित्य बिर्ला पल्प, पेपर व्यवसाय आयटीसीला विकणार
3498 कोटींना व्यवहार होणार
नवी दिल्ली :
आदित्य बिर्ला समूहातील रियल इस्टेट व्यवसाय करणारी कंपनी आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड यांनी आपला पल्प आणि पेपर व्यवसाय आयटीसी या कंपनीला विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विक्रीचा करार 3498 कोटी रुपयांना होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
उत्तराखंडमधील लालकुआ येथे असलेल्या सेंच्युरी पल्प अँड पेपर (सीपीपी)हा व्यवसाय आदित्य बिर्ला समूह आयटीसीला विकणार आहे. आदित्य बिर्ला समूहाला आगामी काळात बांधकाम क्षेत्रामध्ये अधिक लक्ष द्यायचे असून या कारणास्तवच त्यांनी आपला पल्प आणि पेपरचा व्यवसाय विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. आयटीसी या अधिग्रहणानंतर आता पेपर व्यवसाय विस्तार करण्यासाठी धोरण ठरवणार आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये पल्प आणि पेपर उद्योग व्यवसायाने 2382 कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता कंपनीच्या महसुलात 5 टक्के घसरण दिसली होती. आर्थिक वर्ष 2024 मध्ये या उद्योगाने 3375 कोटींचा महसूल प्राप्त केला होता.