‘ओ साथी रे’मध्ये अदिती
अर्जुन रामपाल, अविनाश तिवारीसोबत झळकणार
अमर सिंह चमकीला नंतर नेटफ्लिक्स आणि इम्तियाज अली वेबसीरिज ‘ओ साथी रे’ घेऊन येत आहेत. विंडो सीट फिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेन्मेंटकडून याची निर्मिती केली जात आहे. सीरिजमध्ये अदिति राव हैदरी, अविनाश तिवारी आणि अर्जुन रामपाल दिसून येणार आहेत. इम्तियाज ही रोमँटिक वेबसीरिज घेऊन येत आहे. तोच याचा निर्माता आणि लेखक असेल. या सीरिजचे दिग्दर्शन आरिफ अली करणार आहे. आरिफने यापूर्वी ‘शी’ या सीरिजचे दिग्दर्शन केले हेते. नेटफ्लिक्सने सीरिज ओ साथी रे याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही सीरिज कधी प्रदर्शित होणार हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. ओ साथी रे या सीरिजमध्ये एक आधुनिक कहाणी असून यात मन अन् जीवनातील उलथापालथ देखील आहे. आरिफकडून दिग्दर्शित होणाऱ्या या सीरिजमध्ये अनिवाश, अदिति आणि अर्जुन यासारख्या उत्तम कलाकारांचा संच असल्याचे उद्गार इम्तियाज अलीने काढले आहेत.