चिरंजीवींच्या चित्रपटात अदिती
विवाहानंतर चित्रपटसृष्टीत करणार पुनरागमन
अदिती राव हैदरी आता अनिल रविपुडी याच्याकडून दिग्दर्शित एका आगामी चित्रपटात मेगास्टार चिरंजीवीसोबत दिसून येणार आहे. या चित्रपटात अदितिची निवड मुख्य अभिनेत्री म्हणून केली जाणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थसोबत विवाह केल्यानंतरचा तिचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. चिरंजीवी सध्या वशिष्ठ यांच्याकडून दिग्दर्शित चित्रपट ‘विश्वंभरा’च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यानंतर चिरंजीवी हे आणखी एका चित्रपटासाठी दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांच्यासोबत काम करणार आहेत. तर रविपुडीसोबतचा त्यांचा पुढील चित्रपट अत्यंत खास असणार आहे.
अदिति या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. विवाहानंतरच तिचा हा पहिला मोठा चित्रपट ठरणार आहे. अदिति या पूर्वी नेटफ्लिक्सच्या ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’मध्ये दिसून आली होती. ही सीरिज संजय लीला भन्साळी यांच्याकडून दिग्दर्शित करण्यात आली होती. यात मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, ऋचा चड्ढा या अभिनेत्री देखील दिसून आल्या होत्या.