For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोल्फ स्पर्धेत अदिती अशोक विजेती

06:23 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
गोल्फ स्पर्धेत अदिती अशोक विजेती
Advertisement

वृत्तसंस्था/ मार्बेला (स्पेन)

Advertisement

येथे झालेल्या अँडालुसीया कोस्टा डेल सोल खुल्या महिलांच्या डी इस्पेना आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत भारताची महिला गोल्फपटू अदिती अशोकने विजेतेपद पटकाविले. चालूवर्षीच्या गोल्फ हंगामातील अदितीचे हे दुसरे विजेतेपद आहे.

स्पेनमध्ये झालेल्या या स्पर्धेतील अंतिम फेरीत अदितीने 66 गुणांची नोंद तसेच तिने 9 ऑफ 5 अंडर 31 अशी कामगिरी केली. रविवारी झालेल्या 5 स्पर्धेत अदिती अशोकने नेदरलँड्सच्या अॅनी व्हॅन डॅमचा पराभव केला. शेवटच्या फेरीमध्ये डॅमने सरासरी 68 गुण नोंदविले. 2023 च्या गोल्फ हंगामातील अदितीचे हे दुसरे जेतेपद असून वैयक्तिक गोल्फ कारकिर्दीतील पाचवे अजिंक्यपद आहे. अदितीने चालू वर्षाच्या प्रारंभी केनियात झालेली महिलांची गोल्फ स्पर्धा जिंकली होती. तर टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेत तिने चौथे स्थान मिळविले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.