For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अदिति अन् सिद्धार्थ विवाहबंधनात

06:47 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अदिति अन् सिद्धार्थ विवाहबंधनात

तेलंगणाच्या मंदिरात विवाह झाल्याचे वृत्त

Advertisement

अलिकडेच तापसी पन्नूने गूपचूप विवाह केल्याचे समोर आले हेते. याचदरम्यान आता अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांनी गुपचूप विवाह केला आहे. दोघांनी तेलंगणातील रंगानायकस्वामी मंदिरात विवाह केला आहे. आता चाहते दोघांच्याही विवाहाच्या छायाचित्रांची प्रतीक्षा करत आहेत.

सिद्धार्थ आणि अदिती हे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही बुधवारी विवाह केल्याचे समजते. त्यांच्या या विवाहसोहळ्यात केवळ जवळचे कुटंबीय आणि नातेवाईक सहभागी झाले आहेत. अद्याप या दोघांनीही याची पुष्टी दिलेली नाही.

Advertisement

संबंधित मंदिर हे वानापर्थी येथे असून या ठिकाणाशी अदितीचे खास कनेक्शन आहे. अभिनेत्रीचे आजोबा हे वानापर्थी संस्थानचे अखेरचे शासक होते. अदितीचे आजोबा मुहम्मद सालेह अकबर हैदरी हे आसामचे माजी राज्यपाल देखील राहिले आहेत. अदिती आणि सिद्धार्थ हे स्वत:च्या आयुष्याला अत्यंत खासगी ठेवू इच्छितात. याचमुळे त्यांनी विवाहाविषयी अधिक वाच्यता केली नसल्याचे मानले जात आहे. अदिती आणि सिद्धार्थने 2021 मध्ये तमिळ-तेलगू चित्रपट ‘महा समुद्रम’मध्ये एकत्र काम केले होते. येथूनच दोघे परस्परांच्या प्रेमात पडले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.