महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अदिति अन् सिद्धार्थ विवाहबद्ध

06:02 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

400 वर्षे जुन्या मंदिरात केला विवाह

Advertisement

अदिति राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी विवाह केला आहे. तेलंगणाच्या वानापर्थी येथे असलेल्या 400 वर्षे जुन्या श्रीरंगपूर मंदिरात दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. या विवाहसोहळ्यात केवळ दोघांचे कुटुंबीयच सहभागी झाले. दोघांनी विवाहाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. तसेच दोघांनी परस्परांसाठी प्रेमयुक्त संदेशही जोडला आहे.

Advertisement

सिद्धार्थ आणि अदितीने 2021 मध्ये तमिळ-तेलगू चित्रपट महासमुद्रममध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून दोघांमधील जवळीक वाढली होती. सिद्धार्थ हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता असून त्याने बॉलिवूडच्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. अदिती ही दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आहे. अदितीचे आजोबा जे. रामेश्वर राव हे  तेलंगणाच्या वानापर्थीचे राजे होते. अदितीने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात भरतनाट्याम नृत्यांगना म्हणून केली होती. तिने 2007 मध्ये तमिळ चित्रपट श्रृंगारममध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता.

अदिति आणि सिद्धार्थ या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. सिद्धार्थचा पहिला विवाह 2003 मध्ये मेघना नावाच्या युवतीसोबत झाला होता. 2007 मध्ये हा विवाह संपुष्टात आला होता. तर अदितिचा पहिला विवाह अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत झाला होता. 4 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article