एडीजीपी हेमंत निंबाळकर यांना मुख्यमंत्री पदकाने सन्मानित
बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज मंगळवार दि 2 एप्रिल रोजी पोलीस ध्वज दिनानिमित्त राज्याच्या गुप्तचर विभागाचे IPS, ADGP हेमंत निंबाळकर यांना मुख्यमंत्री पदक 2024 देऊन सन्मानित केले. हेमंत निंबाळकर यांनी राज्य व शेजारील राज्यांतील नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला एकूण 22 पोलीस अधिकारी उपस्थित होते, त्यांनाही या पदकाने सन्मानित करण्यात आले.
यावेळी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी, माजी आमदार व AICC सचिव डॉ. अंजली निंबाळकर आणि त्यांची कन्या रकम्मा निंबाळकर या उपस्थित होत्या. राज्याच्या गुप्तचर विभागाचे महासंचालक असणाऱ्या हेमंत निंबाळकर यांनी बेळगाव जिल्हा अधीक्षक म्हणूनही याआधी सेवा बजावली आहे. त्यांना मिळालेला हा सन्मान बेळगावकारांसाठी अभिमानास्पद असाच आहे.खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपले पती हेमंत निंबाळकर यांना मुख्यमंत्री पदक मिळाल्या बद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला.