महोब्बत कि दुकान खुल गई...भांडवलदारांबरोबरची दोस्ती लोकांच्या शक्तीपुढे हरली- राहुल गांधी
कर्नाटकचा विजय हा भांडवलदारांबरोबरच्या दोस्तीवर म्हणजेच क्रोनी कॅपिटलिझमवरील जनतेच्या शक्तीचा विजय असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी कर्नाटकातील जनतेचे आभार मानले आणि द्वेषाचा पराभव प्रेमापुढे झाला असून इतर सर्व राज्यांमध्येही अशाच प्रकारचा बदल घडून येईल असा विश्वास व्यक्त केला.
आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, "नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. एकीकडे भांडलशाहीचे समर्थन असलेल्यांची ताकद होती तर दुसरीकडे गरीब जनतेची ताकद होती. पण सत्तेपुढे ही ताकद विजून गेली आहे." असे राहुल गांधी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “कर्नाटकमधील निवडणुकीमध्ये द्वेष किंवा शिवीगाळ ही काँग्रेसची शस्त्रे नव्हती. आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी लढलो, कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई, मोहब्बत की दुकानें खुली." असे राहुल गांधी यांनी शनिवारी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटले.