For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : अंगारकी संकष्टीसाठी सांगलीतून गणपतीपुळ्यास जादा एसटी बसेस

06:18 PM Jan 06, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   अंगारकी संकष्टीसाठी सांगलीतून गणपतीपुळ्यास जादा एसटी बसेस
Advertisement

                           सांगलीतून गणपतीपुळ्याकडे एसटीची विशेष वाहतूक व्यवस्था

Advertisement

सांगली : अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे येथे जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या सांगली विभागामार्फत जिल्ह्यातील विविध आगारांतून १५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले. सांगली ही गणरायाची नगरी म्हणून ओळखली जाते.

अंगारकी संकष्टीच्या दिवशी सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक गणपतीपुळे येथे श्री गणरायाच्या दर्शनासाठी जातात. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सांगली विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करण्यात आले.सांगली आगारातून ४ व ५ रोजी गणपतीपुळ्यासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या.

Advertisement

रविवार, सोमवार व मंगळवार पहाटे अशा तीन जादा बसेस सांगली आगारातून रवाना झाल्या. विटा आगारातून मंगळवारी पहाटे ४ ते ८ या वेळेत तब्बल ८ बसेस गणपतीपुळ्याकडे रवाना करण्यात आल्या. मिरज, कवठेमहांकाळ व पलूस आगारातून प्रत्येकी १ बस सोडण्यात आली. इस्लापूर आगारातून अंगारकीनंतर प्रासंगिक करारावर ५ बसेस नियोजित आहेत.

हे नियोजन सांगली आगार नियंत्रक सुनील भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली आगार प्रमुख राजेंद्र घुगरे,मिरज आगार प्रमुख अश्विनी किरगत, विटा आगार प्रमुख उदय पवार, कवठेमहांकाळ आगार प्रमुख अमर निकम आदी अधिकाऱ्यांनी या व्यवस्थेत सहभाग घेतला.

Advertisement
Tags :

.