For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Gold Theft | व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाचा आईच्याच सोन्यावर डल्ला; 24 तासांत चोरीचा पर्दाफाश!

02:04 PM Sep 01, 2026 IST | NEETA POTDAR
gold theft   व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाचा आईच्याच सोन्यावर डल्ला  24 तासांत चोरीचा पर्दाफाश
Advertisement

कोल्हापूर -व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलानेच आईच्या ५ लाख २५ हजार रुपयांच्या सोन्याच्या चिताकवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार करवीर तालुक्यातील महे येथे उघडकीस आला आहे. करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने २४ तासांच्या आत आरोपीला जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Advertisement

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. १५ ते २२ ऑगस्ट दरम्यान फिर्यादी शकुंतला हिंदुराव वाईंगडे, (रा. महे, ता. करवीर) यांच्या राहत्या घरातून ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचेचिताक अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात दि. ३० ऑगस्ट रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची कारवाई अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रविंद्र कळमकर, महेश बांबळे, रणजित पाटील, विजय तळसकर, श्रीधर जाधव, प्रकाश कांबळे, सोमराज पाटील, अमोल चव्हाण, प्रविण बोरचाटे व आत्माराम शिंदे यांच्या पथकाने केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.