महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा प्राथमिक मराठी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान

10:48 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/हिंडलगा

Advertisement

सार्वजनिक शिक्षण खाते व जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या विद्यमाने गट शिक्षणाधिकारी कार्यालय ग्रामीण बेळगाव यांच्यावतीने गांधीभवन येथे आदर्श शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. 13 रोजी आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी मुक्तीमठ शिवानंद स्वामीजी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. तसेच बेळगाव दक्षिण जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नलतवाड बेळगाव ग्रामीणचे गटशिक्षणाधिकारी एस. पी. दासपणावर, बी. आर. सी प्रमुख एम. एस. मेदार, हिंडलगा केंद्राचे समूह संपन्मूल व्यक्ती पाटील उपस्थित होते.

Advertisement

तालुका आदर्श शाळा म्हणूनही निवड 

शाळेने केलेल्या प्रगतीची नोंद शिक्षण खात्याने घेऊन हिंडलगा येथील सरकारी आदर्श प्राथमिक मराठी शाळेची बेळगाव तालुका आदर्श शाळा म्हणून निवड केल्याने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, भेटवस्तू, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक पी. एम. रजपूत व इतर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेचा विकास करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, पालक वर्ग, देणगीदार, माजी विद्यार्थी संघटना तसेच बहिर्जी पावशे फौंडेशनतर्फे डॉ. प्रा. अऊणा पावशे यांनी शाळेला संगणक, टॅब, मोबाईल, दूरदर्शन, स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर,वैज्ञानिक उपकरणे व विज्ञान केंद्र निर्माण केल्याने या भागात एक उत्कृष्ट शैक्षणिक केंद्र बनविले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article