महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार सौ. विमल शिंगड यांना जाहीर

05:20 PM Aug 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

तर रत्नाकर सरवणकर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षण मंडळाचे पुरस्कार जाहीर

Advertisement

ओटवणे  | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षण मंडळाचा यावर्षीचा आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार वेंगुर्ला हायस्कूलच्या सौ विमल शिंगड यांना तर स्वर्गीय हनुमंत दळवी स्मृती आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार कोर्ले धालवली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रत्नाकर सरवणकर यांना जाहिर कऱण्यात आला आहे. यासह आदर्श हिंदी प्रचारक आणि विशेष सन्मान पुरस्काराचे वितरण रविवार १ सप्टेंबर २०२४ रोजी ओरोस माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी होणाऱ्या जिल्हास्तरीय हिंदी शिक्षक संमेलनामध्ये प्रदान करण्यात येणार आहेत.यावर्षी आदर्श प्रचारक पुरस्कारासाठी तालुकानिहाय अंकुश चौरे, जनता विद्यालय (तळवडे सावंतवाडी), सुधाकर आडेलकर, गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय (शिरोडा वेंगुर्ला), अनिकेत वेतुरेकर, रामेश्वर विद्यालय (बांव कुडाळ), श्रीम चेतना पटकारे, माटणे हायस्कूल (माटणे दोडामार्ग), अभय शेर्लेकर, ओझर विद्यामंदिर (कांदळगाव मालवण), जयदीप सुतार, छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय (नेर्ले तिरवडे वैभववाडी), पांडुरंग काळे, कासार्डे हायस्कूल (कासार्डे कणकवली), शामू जंगले शेठ मी. ग. हायस्कूल (देवगड) यांची तर विशेष सन्मान पुरस्कार सावंतवाडीच्या कळसूलकर इंग्लिश स्कूलचे गोपाळ गवस यांना जाहीर करण्यात आला आहे. या संमेलनात हिंदी साहित्य का समरसता में योगदान या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनाला जिल्हयातील हिंदी शिक्षक, हिंदी प्रेमी यांनी उपस्थित राहून रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष सुमंत दळवी, सचिव सदाशिव सावंत, उपाध्यक्ष दिपक तारी, उपकार्याध्यक्ष पंडित माने, कोषाध्यक्ष परशुराम नार्वेकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # news update # tarun bharat official
Next Article