पीटर डिंकलेजसोबत काम करणार आदर्श गौरव
2021मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘द व्हाइट टायगर“मधील आदर्श गौरवच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आदर्श आता हॉलिवूडपटातही दिसून येणार आहे. ‘एलियन : अर्थ 2“ मध्येही तो काम करणार आहे. या प्रोजेक्टमध्ये त्याच्यासोबत दिग्गज कलाकार दिसून येणार आहे.
वेबसीरिज ‘एलियन : अर्थ“च्या दुसऱ्या सीझनसाठी आदर्श अत्यंत उत्सुक आहे. या सीझनमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स“मध्ये टिरियन लॅनिस्टरची भूमिका साकारणारा पीटर डिंकलेज सामील झाला आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी अत्यंत उत्साहित आहे. पहिला सीझन थायलंडमध्ये चित्रित झाला होता. यावेळी आमचा शो लंडनमध्ये चित्रित होणार असल्याचे आदर्शने सांगितले आहे.
आदर्श यापूर्वी 2023 मध्ये प्रदर्शित वेबसीरिज ‘गन्स अॅँड गुलाब“मध्येही मुख्य भूमिकेत होता. या सीरिजची निर्मिती राज अँड डीके यांनी केली होती. तर आदर्श सध्या फर्जी 2 या सीरिजच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. आदर्श हा बॉलिवूडमधील अभिनयात निपुण असलेला दमदार कलाकार असल्याने त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.