For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विल्मर अदानी’पासून ‘अदानी’होणार वेगळे

06:56 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
विल्मर अदानी’पासून ‘अदानी’होणार वेगळे
Advertisement

खासगी इक्विटी कंपन्यांसोबत चर्चा सुरु

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागील काही दिवसांपासून घसरणीत असलेले अदानींचे समभाग हे पुन्हा वैभवात परतले आहेत. परंतु दरम्यान, अदानी समूह आणि त्याचा सिंगापूरचा संयुक्त उपक्रम भागीदार विल्मर इंटरनॅशनल त्यांच्या अन्न उत्पादन कंपनी अदानी विल्मर लिमिटेडचा हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपन्यांनी अनेक खासगी इक्विटी कंपन्यांशी बोलणी केली आहे.

Advertisement

दोन्ही कंपन्यांची अदानी विल्मर लिमिटेडमध्ये 88 टक्के भागीदारी आहे, म्हणजे अदानी समूहाचे 44 टक्के आणि विल्मर इंटरनॅशनलचे 44 टक्के. एका प्रायव्हेट इक्विटी फर्मच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

या वर्षी जानेवारीमध्ये यूएस शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गचा निराधार अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत घसरली. अमेरिकेतील एका मोठ्या खासगी इक्विटी फर्मच्या प्रमुखाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘अदानी आणि विल्मर यांच्या संयुक्त टीमने संभाव्य भागविक्रीसाठी प्रायव्हेट इक्विटीशी संपर्क साधला आहे आणि आम्ही या प्रस्तावावर विचार करत आहोत असे म्हटले होते.

गेल्या आठवड्यात आयोजित एका कार्यक्रमात अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) जुगशिंदर सिंग म्हणाले होते की, समूह सध्या विल्मरमधील आपला हिस्सा कायम ठेवायचा की विकायचा याचा अभ्यास करत आहे.

काय आहे अदानी समूहाची योजना?

अदानीकडे कंपनीत 44 टक्के हिस्सा आहे आणि तो थोडासा हिस्सा राखू शकतो, असे सूत्राने सांगितले.

समूहाने आपला हिस्सा विकल्यानंतर खर्च कोठे करणार?

अदानी समूह 2030 पर्यंत देशभरात 84 अब्ज डॉलर किमतीच्या पायाभूत सुविधा आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या मालिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी या रकमेचा वापर करणार आहे. 2030 पर्यंत ऊर्जा संक्रमण उपक्रमांमध्ये 45 जीडब्लूपर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्यासाठी समूहाची एकूण 75 अब्ज डॉलर गुंतवणूकीची योजना आहे.

Advertisement
Tags :

.