अदानींचा अणुऊर्जा क्षेत्रात लवकरच प्रवेश
2035 पर्यंत 10 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट : वार्षिक सर्वसाधारण सभा
वृत्तसंस्था, मुंबई
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) देशाच्या ऊर्जा क्षेत्रासंदर्भात अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घोषणा केल्या आहेत. औष्णिक, नवीकरणीय, जलविद्युत आणि वायू ऊर्जा क्षेत्रानंतर, अदानी समूह आता देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रातही प्रवेश करणार आहे.
यासाठी समूहाने ‘अदानी अॅटॉमिक एनर्जी’ नावाची एक नवीन कंपनी स्थापन केली असून,
2035 सालापर्यंत 10 गिगावॅट (जीडब्लू) अणुऊर्जा क्षमता
विकसित करण्याचे ध्येय
निश्चित केले आहे. अदानींनी एजीएममध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या.
अणुऊर्जा, ऊर्जा क्षेत्रातील
मास्टर प्लॅन
गौतम अदानी म्हणाले की, अणुऊर्जा प्रकल्पासाठी जमीन यापूर्वी निश्चित करण्यात आलेली नाही. देशातील वाढता वीज वापर आणि भू-राजकीय अनिश्चितता यांच्या पार्श्वभूमीवर, हे पाऊल भारताची दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा मजबूत करेल. समूह कंपनी अदानी पॉवर वीज निर्मितीमध्ये देशातील सर्वात मोठा खासगी गुंतवणूक कार्यक्रम राबवत आहे.
विक्रमी गुंतवणूक -गुंतवणूकदारांचा विश्वास
आर्थिक वर्ष 2025-26 (आर्थिक वर्ष 26) हे अदानी समूहासाठी विक्रमी कामगिरीचे वर्ष ठरले आहे. अदानी समूहाने पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक यावर्षी भारतातील संपूर्ण खासगी क्षेत्राच्या एकूण नवीन भांडवली खर्चाच्या 30 टक्केपेक्षा जास्त आहे.
वीज निर्मितीसाठी 2 लाख कोटीचा खर्च
पुढील 5 वर्षांत 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली खर्चासह वीज निर्मिती क्षमता 45 गिगावॅट्सपर्यंत वाढवण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. समूहाने भूतानच्या की द्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशनसोबत भागीदारी केली आहे, ज्याअंतर्गत दोन्ही मिळून 5,000 मेगावॅट जलविद्युत क्षमता विकसित करतील असा विश्वास अदानी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
? गौतम अदानी, अध्यक्ष, अदानी समूह