कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अदानी पोर्ट्सचा नफा 27 टक्क्यांनी वाढला

06:47 AM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसऱ्या तिमाहीचे निकाल घोषित : कंपनीला  3,109 कोटींचा नफा

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

अदानी ग्रुपची कंपनी असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 3,109.05 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. या कंपनीचा नफा वर्षाच्या आधारावर 27.16 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 2,445 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीने ऑपरेशन्समधून 9,167.46 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. तो वार्षिक आधारावर 30 टक्केने वाढला आहे. जुलै-सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीचा ऑपरेशनल महसूल 7,067.02 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने एकूण 10,004.06 कोटी महसूल नोंदवला.

निकालानंतर समभाग घसरला

दुसऱ्या तिमाहीच्या निकालांनंतर अदानी पोर्टचे शेअर्स किंचित कमी झाले आहेत, ते 0.37 टक्क्यांनी घसरून 1,439.40 वर व्यवहार करत आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरने 2.78 टक्के, 6 महिन्यांत 6.85टक्के आणि एका वर्षात 6.68 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे बाजारमूल्य 3.12 लाख कोटी रुपये आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article