अदानी समूहाच्या नफ्यात वाढ, विक्रीत मात्र घसरण
कंपनीचा नफा 107 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत अदानी समूहाच्या नऊ सूचीबद्ध कंपन्यांचा निव्वळ नफा 23,929 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 10.7 टक्क्यांनी वाढला आहे. संकलित केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत कंपन्यांची निव्वळ विक्री 14 टक्क्यांनी घसरून 1.49 ट्रिलियन रुपये झाली आहे. याच कालावधीत, सेन्सेक्स सूचिबद्ध इतर कंपन्यांच्या निव्वळ विक्रीत 8.1 टक्क्यांनी वाढ झाली आणि त्यांच्या निव्वळ नफ्यात 13.3 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. याचदरम्यान जानेवारीमध्ये कंपनीला अडथळ्याचा सामना करावा लागला होता. जानेवारीमध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर अदानी समूहाचे सहा महिन्यांचे हे पहिले रिपोर्ट कार्ड आहे. मात्र, गटाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नऊ समूह कंपन्यांचे कर्ज 7.7 टक्क्यांनी वाढून 2.39 ट्रिलियन रुपये झाले आहे. समूहातील एका सूत्रानुसार, कंपन्यांच्या हातात रोख रक्कम 43,160 कोटी वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वाढली आहे, जी मागील वर्षी याच अवधीत 33,200 कोटी होती.