For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अदानी समुह करणार 3500 कोटींची गुंतवणूक

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
अदानी समुह करणार 3500 कोटींची गुंतवणूक
Advertisement

नवी दिल्ली : दिग्गज उद्योग समुह अदानी समुह येणाऱ्या काळात मध्यप्रदेशमध्ये दोन प्रकल्प राबविणार असून त्याकरिता 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भातील माहिती अदानी पोर्टस्चे सीईओ करण अदानी यांनी दिली आहे. अदानी समुहाने यापूर्वीही मध्य प्रदेशमध्ये 18250 कोटी रुपये गुंतवलेले असून यामार्फत 12 हजार जणांना रोजगार मिळवून दिला आहे. अदानी समुह मध्यप्रदेशमध्ये 20 दशलक्ष सिमेंटचा कारखाना गुणामध्ये सुरु करणार आहे. याचसोबत शिवपुरी येथेसुध्दा एक कारखाना सुरू करणार असल्याचे समजते. सदरच्या दोन्ही प्रकल्पांसाठी 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून अदानी समुहाकडून आगामी काळामध्ये 3500 जणांना रोजगार मिळू शकणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.