अदानी समूह निर्माण करणार हेलिकॉप्टर
इटलीच्या कंपनीसोबत केला करार : भारतात साकारला जाणार उत्पादन प्रकल्प
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अदानी समूह आणि इटलीतील प्रमुख एअरोस्पेस तसेच संरक्षण कंपनी लियोनार्डोने मंगळवारी भारतात एक इंटीग्रेटेड हेलिकॉप्टर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीम स्थापन करण्यासाठी रणनीतिक भागीदारीची घोषणा केली आहे. हे पाऊल मेक इन इंडिया पुढाकाराला मजबुती देण्यासह हेलिकॉप्टर निर्मितीत भारताची आत्मनिर्भरता वाढविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
या भागीदारीच्या अंतर्गत अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेस आणि लियोनार्डो यांच्यादरम्यान राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात करारावर स्वाक्षरी करण्यात आली. प्रस्तावित मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमचे लक्ष भारतीय सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यावर असेल. खासकरून लियोनार्डोचे अत्याधुनिक एडब्ल्यू169एम आणि एडब्ल्यू109 टेकरएम सैन्य हेलिकॉप्टर्स पुरविण्यात येणार आहे. दोन्ही कंपन्यांकडून जारी वक्तव्यानुसार हे सहकार्य टप्पाबद्ध स्वदेशीकरण, मजबूत देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) क्षमतांच्या विकासासोबत व्यापक वैमानिक प्रशिक्षणही सामील करणार आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रासोबत नागरी उ•ाणातही देशांतर्गत क्षमतांना प्रोत्साहन मिळणार आहे.
भारतातील स्थिती
भारतात हेलिकॉप्टर्सची उपलब्ध अद्याप खूपच कमी आहे. देशाला पुढील 10 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी जवळपास 100 नव्या हेलिकॉप्टर्सची आवश्यकता भासणार असल्याचा अनुमान आहे. नागरी उ•ाण तसेच सैन्याकरताही मोठ्या संख्येत हेलिकॉप्टर्स उपलब्ध करावे लागणार असल्याने ही भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे.
आवश्यकता पूर्ण होणार
ही भागीदारी अशा एव्हिएशन इकोसिस्टीमचा पाया रचत आहे, जी नागरी आणि संरक्षण दोन्ही गरजांना पूर्ण करणार आहे. लियोनार्डोसोबत आमचे सहकार्य केवळ संयुक्त प्राविण्यावर नव्हे तर संयुक्त उद्देशावर आधारित आहे. आम्ही भारताच्या भूमीवर अशी इकोसिस्टीम तयार करणार आहोत, ज्यात निर्माण, असेंबली, प्रशिक्षण आणि विश्वस्तरीय सपोर्ट एकाचवेळी उपलब्ध होणार असल्याचे उद्गार अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेसचे संचालक जीत अदानी यांनी काढले आहेत. भारतीय सशस्त्र दलांनी पुढील दशकात 1000 हून अधिक हेलिकॉप्टर्सच्या मागणीचा अनुमान यापूर्वीच व्यक्त केला आहे. अशास्थितीत ही भागीदारी सार्वभौम संरक्षण उत्पादनाच्या व्हिजनला साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल असल्याचे वक्तव्य कंपनीचे सीईओ आशीष राजवंशी यांनी केले आहे.
लियोनार्डोसाठी भारत मोठी बाजारपेठ
भारत एक मोठी आणि रणनीतिक बाजारपेठ असून येथे सशस्त्र दलांची हेलिकॉप्टर्सची मागणी सातत्याने वाढत असल्याची टिप्पणी लियोनार्डो हेलिकॉप्टर्सचे व्यवस्थापकीय संचालक जियान पिएरो कुटिलो यांनी केली आहे. मागील आठवड्यात अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेसने ब्राझीलची प्रमुख कंपनी एम्ब्राएरसोबत भारतात क्षेत्रीय विमान निर्माण सुविधा स्थापन करण्यासाठी रणनीतिक सहकार्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आता अदानी समुहाने हा नवा करार करत मोठे पाऊल टाकले आहे.