For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अदानी समुह उतरणार डिजिटल पेमेंट व्यवसायात

06:58 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
अदानी समुह उतरणार डिजिटल पेमेंट व्यवसायात
Advertisement

अदानी समुह उतरणार डिजिटल पेमेंट व्यवसायात

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतामध्ये ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा असून आता अदानी समुह देखील या क्षेत्रामध्ये उतरणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

भारतातील सर्वात मोठी सरकारी डिजिटल पेमेंट सिस्टिम, रूपये कार्ड प्रमाणे काम करणाऱ्या युपीआय सेवेचा परवाना घेण्यासंदर्भात संबंधीतांशी अदानी समुह चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. इ कॉमर्स व डिजिटल पेमेंट या क्षेत्रामध्ये सध्याला टाटा, गुगल आणि मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीज या सारख्या कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांशीच अदानी समुह आगामी काळामध्ये स्पर्धा करणार आहे. अदानी समुह अदानी क्रेडीट कार्ड सादर करण्यासाठी विविध बँकांशी चर्चा करत असून लवकरच त्याला अंतिम स्वरूप मिळणार असल्याचे बोलले जात आहे. पेमेंट क्षेत्रासोबतच अदानी समुह ओएनडीसी मार्फत ऑनलाईन शॉपिंगची सुविधा देण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व सुविधा अदानी समुह अदानी वन या अॅपमार्फत देणार आहे असेही समजते. अदानी वन हे अॅप कंपनीने 2022 मध्ये लाँच केले होते.

अदानी समुहाच्या इतर सेवांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना कंपनी आगामी काळामध्ये ई-कॉमर्स आणि पेमेंट सेवेसाठी लक्ष करणार आहे. यामध्ये गॅस ग्राहक, वीज ग्राहक आणि अदानी समुहाच्या विमानतळावरून प्रवास करणारे ग्राहक यांचा समावेश आहे. तज्ञांच्या मते ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये आधीच मोठ्या कंपन्यांची स्पर्धा असताना अदानी समुहाला या व्यवसायामध्ये यश मिळविणे कठीण जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.