अदानी समूहाचे समभाग 14 टक्के तेजीत
06:07 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
बुधवारच्या सत्रामध्ये अदानी समूहातील समभाग जवळपास 14 टक्के इतके तेजीमध्ये राहिलेले दिसून आले. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स यांचे समभाग 7 ते 14 टक्के या दरम्यान बीएसईवर बुधर्वी इंट्राडे दरम्यान वाढलेले पाहायला मिळाले. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर आणि अदानी पोर्ट्स यांचे समभागही 3 ते 5 टक्के यादरम्यान वाढलेले होते. सप्टेंबर तिमाही नफ्यामध्ये चांगली कामगिरी केल्याच्या कारणास्तव समभाग तेजी राखून आहेत.
Advertisement
Advertisement