महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अदानी ग्रीनला मिळाले ऊर्जा वितरणाचे कंत्राट

06:08 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

अदानी समूहातील कंपनी अदानी ग्रीन एनर्जी यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून ऊर्जा वितरणाचे कंत्राट प्राप्त झाले. या कंत्राटांतर्गत अदानी ग्रीन एनर्जी 6600 मेगावॅट नूतनीकरणयुक्त व औष्णिक ऊर्जा वितरण करणार आहेत. ही माहिती समूहाने शेअरबाजाराला दिली आहे.

Advertisement

महाराष्ट्र राज्य सरकारच्या राज्य वीज वितरण कंपनीसोबत नव्या कंत्राटा संदर्भात कंपनीने करार करणार असल्याचे म्हटले आहे. हा करार 25 वर्षांसाठी असणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कंत्राटांतर्गत 1600 मेगावॅटची औष्णिक ऊर्जा आणि 5000 मेगावॅटची सौर ऊर्जा याचे कंत्राट कंपनीला मिळाले.  औष्णिक ऊर्जा क्षेत्रामध्ये अदानी पॉवर ही जगातील सर्वात मोठी निर्मिती कंपनी मानली जाते. नूतनीकरणयुक्त सौर उर्जेचे वितरणही कंपनी करते. सदरच्या कंत्राटासाठी विविध कंपन्यांकडून बोली मागविण्यात आली होती. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जीला अखेर कंत्राट प्राप्त करण्यामध्ये यश मिळाले आहे. हे कंत्राट किती किंमतीला झाले, याचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article