For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अदानी एंटरप्रायझेस होणार सेन्सेक्समध्ये समाविष्ट

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
अदानी एंटरप्रायझेस होणार सेन्सेक्समध्ये समाविष्ट
Advertisement

नवी दिल्ली : अदानी एंटरप्रायझेसचा समभाग सेन्सेक्समध्ये सामील होणार असल्याची माहिती आहे. सदरचा समभाग विप्रोची जागा घेणार आहे. अदानी एंटरप्रायझेसचा समभाग गुरुवारी शेअरबाजारात चांगलाच उसळी घेताना दिसला आहे. समभाग वर्षभरात 9 टक्के इतका वाढला आहे. सदरचा कंपनीचा समभाग लवकरच सेन्सेक्सच्या यादीत समाविष्ट होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा आज शुक्रवार 24 मे रोजी होण्याची शक्यता आहे. सदरचा समभाग 21 जून रोजी लिस्ट होऊ शकतो. प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनीचा समभाग 30 समभागांच्या बीएसईमध्ये समाविष्ट होणार आहे. या समभागाच्या सहभागानंतर बाजारात सेन्सेक्समध्ये 1 हजार कोटींची भर पडणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.