For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘सनफ्लॉवर 2’मध्ये अदा शर्मा

06:01 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सनफ्लॉवर 2’मध्ये अदा शर्मा

सुनील ग्रोवर मुख्य भूमिकेत

Advertisement

सुनील ग्रोवरची लोकप्रिय वेबसीरिज ‘सनफ्लॉवर’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. याची कहाणी हत्या आणि मारेकऱ्याला पकडण्याच्या प्रक्रियेच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. या सीरिजमध्ये आता अदा शर्माची एंट्री झाली आहे.

सनफ्लॉवर सोसायटीत हत्या झाल्याचे आणि पुन्हा एकदा सोनूवर (सुनील ग्रोवर) संशय असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. मग या सोसायटीत रोजी मेहता (अदा शर्मा) रहायला येत आणि त्यानंतर मारेकऱ्याला पकडण्याचा खेळ सुरू होतो. खरा खुनी कोण हे शोधून काढणे असले तरीही पोलीस (रणवीर शौरी) देखील मागे हटत नसल्याचे ट्रेलरमध्ये दर्शविण्यात आले आहे.

Advertisement

सनफ्लॉवर 2 ही सीरिज झी5 वर 1 मार्चपासून पाहता येणार आहे. 2021 मध्ये प्रदर्शित सनफ्लॉवर या सीरिजच्या पहिल्या सीझनचे दिग्दर्शन विकास पहल यांनी केले होते. तर सह-दिग्दर्शक म्हणून राहुल सेनगुप्ता यांनी जबाबदारी सांभाळली होती. या सीरिजमध्ये सुनील ग्रोवर, रणवीर शौरी, गिरिश कुलकर्णी, मुकुल चड्ढा, सोनाली नागरानी, सोनल झा आणि आशीष विद्यार्थी हे कलाकार होते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.