कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘रीता सान्याल’मध्ये अदा शर्मा

06:54 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अभिनेत्री अदा शर्मा स्वत:ची नवी सीरिज ‘रीता सान्याल’मध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये अदाला सान्यालच्या व्यक्तिरेखेत एक वकील अन् हेराच्या भूमिकेत पाहता येणार आहे. ही सीरिज कायदा आणि न्यायव्यवस्थेवर आधारित आहे. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 14 ऑक्टोबरपासून प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement

मी नेहमीच अशाप्रकारची भूमिका साकारू इच्छित होते.  या भूमिकेत बरेच काही माझ्यासारखेच आहे, काही कौतुकास्पद, काहीसे घाबरविणारे अन् प्रेमळ देखील आहे. एक कलाकार म्हणून आम्हाला वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची आवड असते. या सीरिजमध्ये एका अशा युवतीची कहाणी आहे जी वकील अन् गुप्तहेर म्हणून स्वत:चे नाव कमावू पाहत आहे. तसेच तिला कॉमिक बुक वाचण्याची आवड आहे, असे अदा शर्माने नमूद केले आहे. राजेश्वरी नायर आणि कृष्णन अय्यर यांच्याकडून निर्मित या सीरिजचे दिग्दर्शक अभिरुप घोष यांनी केले आहे. सीरिजची कहाणी अमित खान यांनी लिहिली आहे. रीता सान्याल थ्रिलर, भावनात्मक आणि षड्यंत्रांवर आधारित सीरिज आहे. लोक या सीरिजला पसंती देतील अशी अपेक्षा असल्याचे निर्मात्या नायर यांनी म्हटले आहे. या सीरिजमध्ये राहुल देव, अंकुर राठी अणि माणिक पपनेजा हे कलाकारही दिसून येतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article