अभिनेत्री सुकन्या मोने पोहोचल्या ऑस्ट्रेलियात
लेकीच्या पदवीग्रहण सोहळ्याचे खास क्षण केले शेअर
मुंबई
मराठी अभिनेत्री 'सुकन्या कुलकर्णी-मोने' यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मिडीयावर काही फोटोज शेअर केले. त्यांनी ऑस्ट्रेलियेतील त्यांच्या लेकीसोबतचे जुलिया सोबतचे काही खास क्षण इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
जुलिया तिच्या मास्टर डीग्रीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेली होती. तिचा पदवीग्रहण सोहळा नुकताच पार पडला. लेकीच्या या खास क्षणांचा आनंद लुटण्यासाठी अभिनेत्री सुकन्या मोने ऑस्ट्रेलियाला पोहोचल्या. त्यांच्या या ट्रीपमधले काही खास क्षण त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले.
जुलियाने 'अॅनिमल सायन्स' या विषयात 'मास्टर डीग्री' केले आहे. तिने ऑस्ट्रेलिया येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलॅण्ड ब्रिसबेन' येथून हे शिक्षण पूर्ण केले. तिच्या या पदवीग्रहण सोहळ्याच्या आनंदात चाहत्यांनीही सहभागी व्हावे. या ऑस्ट्रेलिया टूरमधील काही फोटोज त्या सोशल मिडीयावर शेअर करत राहतील असा मेसेजही त्यांनी लिहीला आहे. या खास ट्रिपमध्ये सुकन्या मोने आपल्या लेकीसोबत आनंद लुटतानाही दिसत आहेत.