अभिनेत्री लॉरेन गॉटलिब विवाहबद्ध
अमेरिकन डान्सर आणि अभिनेत्री लॉरेन गॉटलिबने स्वत:च्या जीवनाचा नवा अध्याय सुरू केला आहे. अभिनेत्रीने प्रियकरासोबत इटलीच्या टस्कनी येथे ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला आहे. लॉरेनने स्वत:च्या विवाहसोहळ्याची छायाचित्रे चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत खास होता, असे म्हणत लॉरेनने प्रियकराने कधीच प्रपोज केले होते, याची माहिती दिली आहे. लॉरेनचा प्रियकर टोबियास जोनसने मागील वर्षी कॅरेबियनच्या सुंदर अरुबा ओशन व्हिलामध्ये विवाहासाठी तिला प्रपोज केले होत. अभिनेत्रीने या विवाहसोहळ्यात ऑफ शोल्डर पांढऱ्या रंगाचा वेडिंग ड्रेस परिधान केला होता. तर तिचा पती टोबियासने या खास क्षणासाठी ब्लॅक आणि व्हाइट रंगाचा टक्सीडो परिधान केला होता.
लॉरेन ही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. यात ‘एबीसीडी’ या चित्रपटाचा प्रामुख्याने समावेश आहे. लॉरेन ही स्वत:च्या प्रभावी नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाते. नृत्यकौशल्यावर आधारित चित्रपटांना ती प्रामुख्याने प्राधान्य देत असते.