अभिनेत्री हेमल इंगळे अडकली लग्नबंधनात
मुंबई
नवरा माझा नवसाचा २ फेम अभिनेत्री हेमल इंगळे हिचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. हेमलने बिझनेसमन रौनक चौरडीया याच्याशी लग्नगाठ बांधली. नवर्षांच्या प्रारंभी २ तारखेला महाबळेश्वर येथे हेमल आणि रौनकच्या विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
हेमलच्या विवाह सोहळ्यातील खास क्षण तिने सोशल मिडीयावरून आपल्या चाहत्यांशी शेअर केले. लग्नाच्या मांडवात हेमलच्या आईने अगदी खास पद्धतीने जावयाचे स्वागत केले. जावयाच्या आगमनाचा हा खास व्हिडीओ हेमलने इन्स्टावर शेअर केला आहे. यामध्ये तिच्या आई सोबत तिनेही होणाऱ्या नवऱ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
रौनक हा बिझनेसमन आहे. शिक्षणासाठी काही काळ रौनक यु. के. मध्ये होता. यु. के. वरून आल्यावर हेमल व रौनकची मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जवळपास ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. रौनक हा मूळचा कोल्हापूरचा आहे.
हेमलने बोहल्यावर चढण्याआधी आफ्रीन आफ्रिन गाण्यावर एण्ट्री घेतली. यावेळी तिने गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. तर नवरदेव रौनकने ऑफ व्हाईट रंगची शेरवानी परिधान केली होती. या दोघांच्या लग्नाचे फोटो हेमच्या आप्तेष्ठांसोबतच इंडस्ट्रीतील निकटवर्तींनी पोस्ट करत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.